जेरुसलेम - इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संयुक्त राष्ट्र संघामध्ये इस्राइलच्या बाजूने मतदान केल्याबद्दल आभार मानले आहेत. 'धन्यवाद पंतप्रधान मोदीजी, धन्यवाद भारत. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इस्राइलसोबत उभे राहिल्याबद्दल आभार,' असे ट्विट बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे.
इस्रायली पंतप्रधान नेतान्याहूंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, 'हे' आहे कारण - palestine
भारताने याआधी स्वीकारलेला पवित्रा बदलत संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत इस्राइलच्या एका प्रस्तावाच्या समर्थनात मतदान केले. हे मतदान ६ जूनला झाले होते. इस्राइलच्या प्रस्तावात पॅलेस्टाईनच्या एका बिगर-सरकारी संघटनेला सल्लागाराचा दर्जा दिला जाण्यावर आक्षेप घेतला होता.

या संघटनेने 'हमास'सोबतच्या संबंधांविषयी खुलासा केलेला नाही, असे इस्राइलने म्हटले होते. इस्राइलने संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत ६ जूनला मसूदा प्रस्ताव ‘एल १५' सादर केला होता. या प्रस्तावाच्या बाजूने विक्रमी २८ मते मिळाली. तर, १५ देशांनी याविरोधात मतदान केले. तर, ५ देशांनी मतदानात भाग घेतला नाही. प्रस्तावाच्या पक्षात मतदान करणाऱ्या देशांमध्ये ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, आयर्लंड, जपान, कोरिया, यूक्रेन, ब्रिटन आणि अमेरिकेचा सहभाग होता.
परिषदेने संबंधित एनजीओचा अर्ज नाकारण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला या विषयावर विचार करण्यात आला, तेव्हा या बिगर-सरकारी संघटनेने महत्त्वाची माहिती सादर केली नव्हती.