महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना विषाणूवर प्रभावी प्रतिजैवक विकसित केल्याचा इस्त्रायलचा दावा

हे प्रतिजैवकाचं आता पेटंट घेण्यात येणार असून कमर्शीयल वापर करण्यासाठी करार करण्यात येणार असल्याचे जेरुसलेम पोस्टने म्हटले आहे. तब्बल १०० संशोधक लस तयार करत आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 5, 2020, 2:16 PM IST

Updated : May 5, 2020, 3:49 PM IST

हैदराबाद - कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रभावी प्रतिजैवक (अँटिबॉडी) तयार केल्याचा दावा केला आहे. देशातील बायॉलॉजिकल रिसर्च इन्स्टीट्यूटने अँटिबॉडी विकसित केल्याचे संरक्षण मंत्रालायने सांगितले आहे. जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिले आहे.

विकसित करण्यात आलेले प्रतिजैविक कोरोना विषाणूवर हल्ला करून त्याला नष्ट करते. सोमवारी देशाच्या संरक्षण मंत्री नफताली बेनिट्ट यांनी बायॉलॉजिकल रिसर्च इन्स्टीट्यूटला भेट दिली.' मला इन्स्टीट्यूटचा अभिमान आहे. हे खूप मोठं यश आहे. ज्यू लोकांची सर्जनशिलता आणि चातुर्य यातून दिसून आल्याचे नफताली म्हणाल्या'.

हे प्रतिजैवकाचं आता पेटंट घेण्यात येणार असून कमर्शीयल(व्यापारी) वापर करण्यासाठी करार करण्यात येणार असल्याचे जेरुसलेम पोस्टने म्हटले आहे. तब्बल १०० संशोधक लस तयार करत आहेत. यातील काही क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यावर लवकच येणार आहेत. मात्र, यातील कोणती लस सुरक्षितपणे काम करेल आणि लवकर तयार होईल, हे आत्ताच सांगता येत नाही, असे पोस्टने म्हटले आहे.

१२ ते १८ महिन्यांत कोरोनावर लस तयार झाली तरी तो एक विक्रम असेल, असे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे प्रमुख डॉ. अँथनी फाऊची यांनी मत व्यक्त केले आहे. जगभरात अडिच लाख लोकांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे, तर ३० लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

Last Updated : May 5, 2020, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details