तेहरान -कोरोना विषाणूमुळे वाढणाऱ्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इराणमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ६३ नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती देशाच्या सरकारने दिली. त्यामुळे, इराणमधील एकूण बळींची संख्या आता ३५४ वर पोहोचली आहे.
इराणच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. तसेच, ३५४ नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. इराणच्या सर्व प्रांतांमध्ये हा विषाणू पसरला असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.