महाराष्ट्र

maharashtra

भारत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानला उद्धवस्त करण्यासाठी करू शकतो, इम्रान खानला भीती

By

Published : Oct 27, 2020, 3:49 PM IST

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकार केवळ पाकिस्तानचा नाही तर मुस्लीम समाजाचा द्वेष करते. त्यांनी भीती वाटते, की भारत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इस्लामाबादवर दहशत जमविण्यासाठी करू शकतो.

imran-fears
इम्रान खान

इस्लामाबाद - जेव्हा शत्रु राष्ट्र आपल्याला घाबरते तेव्हा चांगले वाटते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या भारताबद्दलच्या अशाच एका भीतीने ग्रस्त आहेत. यामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनाला चांगले वाटेल. पाकच्या पंतप्रधानांना वाटते की भारत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानला उद्धवस्त करण्यासाठी वापरेल. पाकिस्तान- अफगाणिस्तान दरम्यान दोन दिवसीय व्यापार व गुंतवणूक मंचचे उद्घाटन करताना इम्रान खान यांनी ही भीती व्यक्त केली.

इम्रान खान म्हणाले, की आम्ही भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र यश मिळत नाही. भारताचे संपूर्ण धोरण व नीती पाकिस्तानच्या विरुद्ध आहे. नरेद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताचे सरकार केवळ देश म्हणून पाकिस्तानच्या विरुद्ध नसून ते मुस्लीम लोकसंख्येचाही द्वेष करतात.

भारतातील अल्पसंख्यांक समाज दडपणाखाली - इम्रान खान

भारतातील मुस्लिमांना यापूर्वी कधीही मिळाली नव्हती अशी हीन वागणूक मिळत आहे. तेथे अल्पसंख्यांक समाज सतत दडपणाखाली वावरत आहे. काश्मीर समस्येवर बोलताना इम्रान खान म्हणाले, की निर्दोष काश्मिरींवर अत्याचार करण्याचा भारत सरकारचा अजेंडा राहिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details