माऊंट तोमाह -ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स प्रांतात १०० हून अधिक ठिकाणी आगी लागल्या आहेत. येथील सर्वच अग्निशामक दले या आगींशी झुंज देत असल्याचे एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.
न्यू साउथ वेल्सचे ग्रामीण अग्निशमन सेवा आयुक्त शेन फित्झीम्मॉन्स यांनी देशात लागलेल्या निम्म्याहून जास्त आगी नियंत्रणात आल्या नसल्याचे म्हटले आहे. यामुळे देशात उष्णतेची लाट येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा -सीरियामध्ये बॉम्बवर्षाव, एकाच कुटुंबातील सात जणांसह 23 ठार
ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी येथील तापमान गुरुवारी ३५ अंशांहून (९५ फॅरेनहाईट) अधिक वाढेल. तर, न्यू साउथ वेल्सच्या काही भागांमध्ये ते ४० अंश सेल्सियस (१०४ फॅरेनहाईट)
या परिस्थितीच्या शक्यतेमुळे सतर्क राहण्याचा इशारा येथील रहिवाशांना देण्यात आला आहे. न्यू साउथ वेल्समध्ये सार्वजनिक ठिकाणी रविवारपर्यंत कोणत्याही प्रकारची आग पेटवण्यास मनाई करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया धगधगतोय; १०० हून अधिक ठिकाणी आगी