महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 22, 2020, 3:55 PM IST

ETV Bharat / international

तालिबानचा मोठा हल्ला; अफगाणिस्तानचे सुमारे ३०० जवान ठार..

देशाच्या ३४ प्रांतांपैकी ३२ प्रांतांमध्ये तालिबानने एकूण ४२२ हल्ले केले आहेत. यामध्ये एएनडीएसएफचे (अफगाणिस्तान नॅशनल डिफेन्स अ‌ॅण्ड सिक्युरिटी फोर्सेस) २९१ सैनिक ठार, तर ५५० सैनिक जखमी झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जावेद फैसल यांनी दिली आहे. गेल्या १९ वर्षांमधील सर्वात भीषण असा हा आठवडा होता. यादरम्यान ४२ नागरिक देखील ठार झाले, तसेच १००हून अधिक नागरिक जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

291 Afghan soldiers dead in Taliban attacks: Govt
तालिबानचा मोठा हल्ला; अफगाणिस्तानचे सुमारे ३०० जवान ठार..

काबुल :गेल्या आठवडाभरात तालिबानने केलेल्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानचे २९१ सैनिक ठार झाल्याची माहिती तेथील सरकारने दिली आहे. यासोबतच, सुमारे ५५० सैनिक यात जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. २००१मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच एका आठवड्याच्या कालावधीमध्ये अफगाणिस्तानचे एवढे सैनिक मारले गेले आहेत.

देशाच्या ३४ पैकी ३२ प्रांतांमध्ये तालिबानने एकूण ४२२ हल्ले केले आहेत. यामध्ये एएनडीएसएफचे (अफगाणिस्तान नॅशनल डिफेन्स अ‌ॅण्ड सिक्युरिटी फोर्सेस) २९१ सैनिक ठार, तर ५५० सैनिक जखमी झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जावेद फैसल यांनी दिली आहे. गेल्या १९ वर्षांमधील सर्वात भीषण असा हा आठवडा होता. यादरम्यान ४२ नागरिक देखील ठार झाले, तसेच १००हून अधिक नागरिक जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिका आणि तालिबानमधील शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर, अफगाणदेखील तालिबानसोबत चर्चा करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्यापूर्वीच हे हल्ले सुरू झाले आहेत. २९ फेब्रुवारीला दोहामध्ये अमेरिका-तालिबान शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. ज्यानुसार २०२१च्या मध्यापर्यंत अमेरिका, अफगाणिस्तानमधील आपले सैन्य मायदेशी बोलावणार होते. याबदल्यात तालिबान आपले हल्ले थांबवणार होते. मात्र, त्यानंतर तालिबानने या करारापासून पाठ फिरवली आणि अफगाणिस्तानने ताब्यात घेतलेल्या तालिबानींना सोडण्याची अट समोर ठेवली. यानुसार ५,००० तालिबानींच्या बदल्यात १,००० सैनिक ते सोडणार होते. मात्र यातही काही बेबनाव झाल्यामुळे तालिबानने अफगाणिस्तानवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती.

तर, तालिबानच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तान सरकार मृतांची संख्या फुगवून सांगत आहे. शांतता कराराचे प्रयत्न कमकुवत करण्यासाठी अफगाण सरकार असे करत असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. गेल्या आठवड्यात ते म्हणतात तेवढ्या प्रमाणात हल्लेच झाले नसल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबैहुल्ला मुजाहिदने म्हटले आहे. त्याने सांगितले, की तालिबान आणि लष्करामध्ये चकमकी झाल्या आहेत. मात्र, सुरक्षा दलांनी हल्ले केल्यानंतर तालिबानने केवळ प्रत्युत्तर दिले आहे.

तालिबानी आणि सैनिकांचा व्यवहार काही प्रमाणात सुरू आहेच; ज्यामध्ये आतापर्यंत ३,००० तालिबानींच्या बदल्यात ५०० अफगाण सैनिकांची सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा :'कोरोना संकटाचा फायदा घेत चीनचं अमेरिकेविरोधात आर्थिक युद्ध'

ABOUT THE AUTHOR

...view details