बैरूत - तुर्कस्तानच्या ड्रोन हल्ल्यात सीरियाचे २६ जवान ठार झाले आहेत. सीरियाच्या वायव्य भागामध्ये शनिवारी हा हल्ला झाल्याची माहिती 'सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राईटस् वॉर मॉनिटर' या संघटनेने माहिती दिली. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांनी सीरियाला हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार सीरियाने ड्रोन हल्ला केला.
शुक्रवारी सीरियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तुर्कस्तानच्या ३३ जवानांचा मृत्यू झाला होता. तर एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सीरियाच्या वायव्येकडील ईब्दील आणि अलेप्पो भागांमध्ये शनिवारी हल्ला करून तुर्कस्तानने जवानांच्या हत्येचा बदला घेतला.