काबूल - अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील आणि पश्चिमीकडील वेगवेगळ्या प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ले केले. या हल्ल्यांत २१ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली.
अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यात २१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू - died
पश्चिमी बादगीस प्रांतातील गव्हर्नरांचे प्रवक्ते जमशेद शाहबी यांनी सांगितल्याप्रमाणे, बंडखोरांनी बुधवारी चौक्यांवर हल्ला केला. यात सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिमी बादगीस प्रांतातील गव्हर्नरांचे प्रवक्ते जमशेद शाहबी यांनी सांगितल्याप्रमाणे, बंडखोरांनी बुधवारी चौक्यांवर हल्ला केला. यात सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तरेकडील बगलान प्रांतातील काउंसिलचे सदस्य शम्स उल हक यांनी सांगितल्याप्रमाणे येथे बंडखोरांनी बुधवारी केलेल्या हल्ल्यात स्थानिक पोलीस दलातील सात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
उत्तरेकडील तखार प्रांतातील काउंसिलचे सदस्य रूहोल्लाह राउफी यांनी म्हटले आहे, की येथे आठ पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या गालून हत्त्या करण्यात आली. या सर्व ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत एकूण २३ सुरक्षा कर्मचारी जखमीही झाले आहेत. तालिबानने या सर्व हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.