फ्रान्समधील येलो वेस्ट आंदोलन चिघळले, पॅरिसमध्ये हिंसाचार - Yellow vest protest
आंदोलनकर्त्यांकडून रस्त्यावरील सरकारी कार्यालये, बँका, रेस्टॉरंट यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पॅरिस - फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये 'येलो वेस्ट' आंदोलनाला पुन्हा सुरुवात झाली आहे. हे आंदोलन फ्रान्स सरकारच्या करवाढ निर्णयाविरोधात करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून करण्यात येत असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून रस्त्यावरील सरकारी कार्यालये, बँका, रेस्टॉरंट यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. या आंदोलकांनी पॅरिसमधील आर्क दी ट्रियॉम्फ या स्मृतिस्थळावर दगडफेकही केली. हिंसाचार करण्यात येत असलेल्या आंदोलनकर्त्यांना कठोर प्रत्युत्तर देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून यावेळी सांगण्यात आले आहे. काही लोकांना हिंसा हवी आहे, म्हणूनच ते पॅरिसमध्ये गोंधळ घालत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.