महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना : सतरा दिवसानतंर प्रथमच स्पेनमध्ये कमी मृत्यूंची नोंद

देशभरात दररोज 800 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत होता. मात्र, आता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

file pic
कोरोना संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 10, 2020, 5:03 PM IST

माद्रिद - युरोपातील स्पेन देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत स्पेनमध्ये 1 लाख 57 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 800 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आज दिवसभरात देशात कोरोनामुळे सर्वात कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 17 दिवसानंतर सर्वात कमी म्हणजे 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात दररोज 800पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत होता. मात्र, आता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात एकूण 53 हजार रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. 80 हजारांपेक्षा जास्त केसेस अ‌ॅक्टिव्ह आहेत. दिवसभरात आज स्पेनमध्ये 3 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details