महाराष्ट्र

maharashtra

नागरिकत्व (सुधारणा) कायद्यावरून इम्रान खान यांची भारताला अणुयुद्धाची पुन्हा एकदा धमकी

By

Published : Dec 18, 2019, 11:48 PM IST

'जेव्हा एखादा अण्वस्त्रसंपन्न देश अखेरच्या क्षणापर्यंत लढतो, तेव्हा त्यांचे परिणाम सीमांच्याही पलीकडचे असतात. मी तुम्हाला इशारा देत आहे. ही धमकी नाही तर, चिंता आहे की, आपण स्वतःला कोणत्या दिशेकडे नेत आहोत. जर असेच काही चुकीचे घडत गेले तर, तुम्ही चांगलेच होण्याची आशा करा. मात्र, अत्यंत भयानक दुष्परिणामांसाठी तयार रहा,' अशी धमकी पाकिस्तानने जागतिक व्यासपीठावर भारताला दिली आहे.

नागरिकत्व (सुधारणा) कायद्यावरून इम्रान खान यांची भारताला अणुयुद्धाची पुन्हा एकदा धमकी
नागरिकत्व (सुधारणा) कायद्यावरून इम्रान खान यांची भारताला अणुयुद्धाची पुन्हा एकदा धमकी

जिनिव्हा - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकत्व (सुधारणा) कायद्यावरून भारताला अणुयुद्धाची धमकी पुन्हा एकदा दिली आहे. या कायद्यानुसार, शेजारील देशांमधून भारतात येणाऱ्या मुस्लिमेतर निर्वासितांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे.

पहिल्या जागतिक निर्वासित मंचावर इम्रान खान सह संयोजक म्हणून बोलत होते. 'भारताने मंजूर केलेल्या नागरिकत्व (सुधारणा) कायद्यामुळे दोन अण्वस्त्रसंपन्न देशांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - सीरियामध्ये बॉम्बवर्षाव, एकाच कुटुंबातील सात जणांसह 23 ठार

'मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, त्यांनी आशिया खंडाच्या दक्षिण भागात येऊ घातलेल्या निर्वासितांच्या समस्येविषयी जागरूक व्हावे. पाकिस्तान आणि आम्हाला येथे केवळ निर्वासितांची समस्या निर्माण होण्याविषयीचीच चिंता लागली नसून यापेक्षाही येथे मोठा संघर्ष उभा राहील, अशी चिंताही भेडसावत आहे. दोन अण्वस्त्रसंपन्न देशांमध्ये हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे,' अशी वल्गना खान यांनी पुन्हा एकदा केली आहे.

खान यांनी भारताने मंजूर केलेल्या नागरिकत्व (सुधारणा) कायदा 2019 कडे ओझरता दिशानिर्देश केला. या कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या मुस्लिमेतर निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे.

हेही वाचा - चीनमध्ये दगडी कोळसा, नैसर्गिक वायू खाणीत स्फोट, १६ जणांचा मृत्यू

'जेव्हा एखादा अण्वस्त्रसंपन्न देश अखेरच्या क्षणापर्यंत लढतो, तेव्हा त्यांचे परिणाम सीमांच्याही पलीकडचे असतात. मी तुम्हाला इशारा देत आहे. ही धमकी नाही तर, चिंता आहे की, आपण स्वतःला कोणत्या दिशेकडे नेत आहोत. जर असेच काही चुकीचे घडत गेले तर, तुम्ही चांगलेच होण्याची आशा करा. मात्र, अत्यंत भयानक दुष्परिणामांसाठी तयार रहा,' अशी धमकी पाकिस्तानने जागतिक व्यासपीठावर भारताला दिली आहे.

पाकिस्तान भारतावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. याआधी भारतीय संसदेने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ ए रद्द ठरवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतविरोधी प्रचार करण्याचा धडाका लावला होता. मात्र, भारताने वारंवार जम्मू-काश्मीरविषयीचा निर्णय ही आपली अंतर्गत बाब असल्याचे अधोरेखित केले होते. आता नागरिकत्व (सुधारणा) कायद्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानने भारताला पुन्हा एकदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details