नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमारेषेवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशातील सैन्यदलात चर्चेच्या आणखी फेऱ्या होणार आहेत. अशातच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लढाईसाठी मन आणि उर्जाने तयार राहावे, असै सैनिकांना आदेश दिले आहेत. ते गौनडोंग प्रांतामधील नौसैनिकांना संबोधित करत होते.
चीनची युद्धाची खुमखुमी; शी जिनपिंग यांनी सैन्यदलाला 'हे' केले आवाहन - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग
चीन-भारतामधील सीमारेषेच्या वादाबाबत अद्याप तोडगा निघाला नाही. शांततामय बोलणी सुरू होणार असताना चीनच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानामुळे चीनला युद्धाची वाटणारी खुमखुमी पुन्हा दिसून आली आहे.
चीनच्या वृत्तसंस्थेच्या माहितीनसुार शी जिनपिंग यांनी सैनिकांना युद्धासाठी अत्यंत दक्ष राहण्यास सांगितले आहे. सैन्यदलाने अत्यंत एकनिष्ठ, अत्यंत शुद्ध आणि पूर्णपणे विश्वसनीय राहावे, असे जीनपिंग यांनी सैनिकांना संबोधत असताना सांगितले. पुढे जिनपिंग म्हणाले, की लाल गुणसुंत्रांची परंपरा पुढे नेण्याची गरज आहे. नाविक सैन्यांची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी करण्याची गरज आहे. मृत्यूसारख्या संकटालाही न घाबरता लढण्याचा उत्साह हा सैनिकांमध्ये आणायचा असल्याचेही जिनपिंग यांनी म्हटले आहे. नौसैनिकांना विविध गोष्टी करण्यासह विविध क्षमता असणे गरजेचे आहे.
दरम्यान, चीनची भारतासह अमेरिकेबरोबर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांनी सैन्यदलाला केलेले आवाहन हे महत्त्वाचे ठरत आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केल्यानंतर भारत-तणावामध्ये स्थिती आहे. दोन्ही देशांमध्ये राजनैतिकसह सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पा