महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जगभरात कोरोना विषाणूमुळे 1 लाख नागरिकांचा मृत्यू - कोरोना बाधा

वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देशांनी संचारबंदी लागू केली असून नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजून लस तयार होण्यास वेळ लागणार आहे.

corona file pic
कोरोना संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 10, 2020, 11:24 PM IST

नवी दिल्ली -कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. जगभरात आत्तापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने 1 लाख 157 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 16 लाख 39 हजार 772 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूमुळे जागतिक आणिबाणी निर्माण झाली आहे.

अशा बिकट परिस्थितीतही आशादायक गोष्ट म्हणजे 3 लाख 69 हजार नागरिक उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. वृद्ध व्यक्तींचा किंवा आधीच एखाद्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांचा सर्वात जास्त मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वात जास्त 4 लाख 77 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वात जास्त मृत्यू युरोपातील इटली देशात झाले असून त्या खालोखाल अमेरिकेत रुग्ण दगावले आहेत.

वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देशांनी संचारबंदी लागू केली असून नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजून लस तयार होण्याच वेळ लागणार आहे. अनेक कंपन्यांनी तयार केलेली लशीचा वापर मानवावर करण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या फैलावामुळे जागतिक व्यापार, पर्यटन, वाहतूक, उद्योगधंदे सर्व ठप्प झाले आहेत. आरोग्याची जागतिक आणिबाणी निर्माण झाली आहे.

विविध देशांतील परिस्थिती

अमेरिका - 4 लाख 77 हजार रुग्ण तर 17 हजार 910 मृत्यू

इटली - 1 लाख 47 हजार रुग्ण तर 18 हजार 849 मृत्यू

स्पेन - 1 लाख 57 हजार रुग्ण, तर 15 हजार 970 मृत्यू

जर्मनी - 1 लाख 19 हजार रुग्ण, तर 2 हजार 600 मृत्यू

फ्रान्स - 1 लाख 17 हजार रुग्ण, तर 12 हजार 210 मृत्यू

इंग्लड- 65 हजार रुग्ण, तर 8 हजार 931 मृत्यू

तुर्कस्तान - 42 हजार रुग्ण तर 900 मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details