महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाखांच्या जवळ; 49 हजार मृत्यू - कोरोना संसर्ग

जगभरामध्ये 200पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिका आणि युरोपला सर्वात जास्त कोरोनाचा फटका बसला आहे.

corona infection
कोरोना प्रसार

By

Published : Apr 2, 2020, 8:26 PM IST

हैदराबाद - जगभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून 10 लाखांच्या उंबरठ्यावर आहे. 9 लाख 61 हजार 448 जणांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर 49 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये दिलासा देणारी बाब म्हणजे 2 लाख 3 हजार रुग्ण पूर्णत: बरे झाले आहे.

या सर्व रुग्णांमध्ये 6 लाख 72 हजार अ‌ॅक्टिव केस आहेत. तर 36 हजार 224 जण अत्यवस्थ आहेत. जगभरामध्ये 200पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातेल आहे. अमेरिका आणि युरोपला सर्वात जास्त कोरोनाचा फटका बसला आहे. चीनमधून कोरोनाचा प्रसार सर्वात आधी झाला असून आता कोरोना जगभर थैमान घालत आहे.

विविध देशात कोरोनाचे रुग्ण

  • अमेरिका - 2 लाख 15 हजार 362 तर मृत्यू 5 हजार 113
  • इटली - 1 लाख 10 हजार 574 रुग्ण तर मृत्यू 13 हजार 155
  • स्पेन - 1 लाख 10 हजार 238 रुग्ण तर 10 हजार 3 मृत्यू
  • फ्रान्स - 56 हजार 989 रुग्ण तर 4 हजार 32 मृत्यू
  • इराण - 50 हजार रुग्ण तर 3 हजार 160 मृत्यू
  • इंग्लड - 33 हजार 718 रुग्ण तर मृत्यू 2 हजार 921 मृत्यू
  • स्वित्झर्लंड - 18 हजार 267 रुग्ण तर 505 मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details