काबूल -अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली आहे. पूर्वीपेक्षा अधिक तालिबानी ताकद वाढली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी तालिबान्यांसमोर शरणागती पत्करात रविवारी (१५ ऑगस्ट) राजीनामा दिला. ते देश सोडून तझाकिस्तानला पळून गेले आहेत. अफगाणिस्तान गेल्या काही दिवसांत झालेल्या घडामोडींवर आणि तेथील संपूर्ण परिस्थितीवर देशभरातील नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जगातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या...
ब्रिटन...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अमेरिका आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्ध्यक्ष जो बायडेन यांच्यावर अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे खापर फोडलं आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य वापसीचा निर्णयाने गोष्टी वेगाने झाल्या, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी अफगाणिस्तानला दहशतवादाचे केंद्र होण्यापासून रोखण्यासाठी पश्चिमी नेत्यांना एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. अफगाणिस्तानमध्ये लवकरच एक नवी सत्ता येईल. ही सत्ता कशा प्रकारची असेल, याबद्दलही आपल्या माहिती नाही त्यामुळे अफगाणिस्तानला दहशतवादाचे केंद्र होण्यापासून रोखण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. तसेच तालिबानला द्विपक्षीय मान्यता देऊ नये, असे ते म्हणाले.
कॅनडा...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत दु:खद असल्याचे म्हटलं. वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीवर आमचे लक्ष आहे. अफगाण नागरिक सध्या ज्या परिस्थितीमध्ये अडकले आहेत. ते पाहून अत्यंत दु:ख होत आहे, असे ते म्हणाले. 20,000 हून अधिक असुरक्षित अफगाण निर्वासितांचे स्वागत करण्यासाठी कॅनडा आपल्या पूर्वीच्या विशेष इमिग्रेशन कार्यक्रमाची निर्मिती करणार आहे.
रशिया...
अफगाणिस्तानमधील परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या त्वरित हस्तक्षेपाची गरज आहे. नवीन मानवतावादी आपत्ती टाळण्यासाठी हे महत्वाचे आहे, असे रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात परराष्ट्र व्यवहार प्रमुख लिओनिड स्लुटस्काय म्हणाले.
ऑस्ट्रेलिया...