नवी दिल्ली - तालिबानींनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अनागोंदी सुरुच आहे. अफगानिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलमधून (Kabul) युक्रेनच्या (Ukraine) विमानाचे अज्ञात लोकांनी अपहरण (Hijacked) केले आहे. हे विमान युक्रेनच्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानात पोहोचले होते.
युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री येवगेनी येनिन म्हणाल्या, की युक्रेनच्या लोकांना एअरलिफ्ट करण्याऐवजी हे विमान इराणमध्ये नेण्यात आले. आम्ही तीन वेळा एअरलिफ्ट करण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. कारण, आमचे लोक विमानतळापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
हेही वाचा-Afghanistan crisis : 'सैन्य माघारीचा निर्णय योग्यच, बायडेन ठाम; मात्र निक्की हेलींची टीका
परराष्ट्र मंत्र्यांच्या माहितीनुसार ज्या लोकांनी विमानाचे अपहरण केले आहे, त्या सर्वांजवळ हत्यारे होते. मात्र, विमानाचे काय झाले, विमान आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण राजनैतिक सेवा कार्यरत आहे.
हेही वाचा-टीटीपीला अफगाण भूमीचा वापर करू न देण्याचे तालिबानचे आश्वासन; पाकचा दावा