टोकियो- कोरोना विषाणूने चीनच्या हुबेई प्रांतामध्ये थैमान घातले असतानाच २५ देशांमध्येही या विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. जपानच्या योकोहामा किनाऱ्यावर 'डायमंड प्रिन्सेस' नावाचे एक जहाजामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. बंदरामध्ये हे जाहज अलिप्त ठेवण्यात आले आहे. या जहाजामध्ये १३२ कर्मचाऱ्यांसह एकून ३ हजार ७११ प्रवासी आहेत. यातील तीन भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती जपानमधील भारतीय दुतावासाने दिली आहे.
जपानच्या किनाऱ्यावरील अलिप्त ठेवलेल्या जहाजातील तीन भारतीयांना कोरोनाची लागण - डायमंड प्रिन्सेस जहाज
कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळे २१८ जणांवर जहाजामध्येच उपचार सुरू आहेत. आतमध्ये अडकून पडलेल्या सर्व भारतीयांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती भारतीय दुतावासाने दिली आहे.
कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळे जहाजामधील २१८ जणांवर उपचार सुरू आहेत. जहाजात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ज्या भारतीयांना विषाणूची लागण झाली आहे, ते जहाजावरील कर्मचारी आहेत. लागण झालेल्या तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अडकून पडलेल्या सर्व भारतीय नागरिकां संपर्क साधण्यात आल्याची माहिती भारतीय दुतावासाने दिली आहे.
एकून प्रवाशांपैकी ६ जण भारतीय आहेत. सर्वांना जहाजामध्येच ठेवण्यात आले आहे. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जपानमधील भारतीय दुतावासअधिकाऱ्यांच्या संपर्कात असून अडकलेल्या प्रवाशांना मदत करत असल्याची माहिती दिली. कोरोनाची लागण झालेल्या भारतीय रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती दुतावासाने दिली. ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, अशांना बाहेर सोडण्याची प्रक्रिया जपानने सुरू केली आहे.