हाँगकाँग - हाँगकाँगमधील इमारतीत लागलेल्या आगीत सात लोक ठार तर अनेक गंभीर जखमी झाले. येथील सरकारने सोमवारी ही माहिती दिली.
रविवारी रात्री आठच्या सुमारास जॉर्डनच्या कॅन्टन रोडवरील नेपाळी रेस्टॉरंटमध्ये आग लागली, अशी माहिती सिन्हुआने दिली आहे. सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
हेही वाचा -पाकिस्तान : प्रवासी वाहन खड्ड्यात कोसळून 8 जण ठार, 11 जखमी
स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, मृतांपैकी बहुतेक जण नेपाळी होते आणि त्यात एका नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
सोमवारी अग्निशमन सेवा विभागाच्या अधिकाऱ्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, अपार्टमेंटच्या आत एक मेळावा झाला होता. तर, हे या परिसरातील विना परवाना चालणारे रेस्टॉरंट आहे का, याची आम्ही चौकशी करत आहोत, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.
हाँगकाँगचे चीफ एक्झिक्युटिव्ह कॅरी लॅम यांनी आपल्याला या घटनेमुळे तीव्र दुःख झाले आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे . त्यांनी जखमींवर उपचार आणि अपघाताचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा -इथिओपियामध्ये बसवर दहशतवादी हल्ला; ३४ ठार