कंधार -दानिश सिद्दिकी या भारतीय पत्रकाराचा वृत्ताकंन करत असताना अफगाणिस्तानात मृत्यू झाला आहे. दानिश सिद्दिकी हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते. सिद्दीकींचा मृत्यू कंधार प्रांतातील स्पिन बोल्डक भागात झाला आहे. दानिश सिद्दिकी हे गेल्या काही दिवसांपासून कंधारमधील परिस्थितीचे वृत्तांकन करत होते. भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंडझे यांनी सिद्दीकीच्या मृत्यूविषयीचे ट्विट केले.
रॉयटर्सचे संपादक अलेस्नद्रा गलोनी यांनी सिद्दीकीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, 'दानिश हा उत्कृष्ट पत्रकार होतो. तो एक चांगली पती, वडील आणि सहकारी होता. दानिच्या कुंटुंबीयांबद्दल आमची सहानुभूती आहे'.
तीन दिवसाअगोदर केलं होतं ट्विट -
दानिश आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कंधारमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराचे वृत्ताकंन करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यासंदर्भात त्यांनीच तीन दिवसाअगोदर ट्विटरवर माहिती दिली होती. हल्ल्यातून सुदैवाने मी बचावलो, असे ते म्हणाले होते. तसेच 2018 मध्ये मिळालेल्या पुलित्झर पुरस्काराचा उल्लेख करत रोहिंग्या निर्वासितांच्या संकटावेळी गाडीमध्ये प्रवास केला होता. त्याला सुद्धा कसे लक्ष्य केले होते, याबाबतची माहिती दिली होती. यापूर्वीही सिद्दीकी यांनी एका चकमकीची माहिती रॉयटर्सला दिली होती. तसेच त्यादरम्यान हाताला जखम झाल्याचेही सांगितले होते. दानिश सिद्दीकी हे अफगाण लष्करासोबत होते आणि तेथील तालिबानींच्या कारवायांचं वृत्तांकन करत होते. त्यादरम्यान त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला.