नवी दिल्ली : अफगाणिस्तानात मृत्यूमुखी पडलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकींच्या मृत्यूवर तालिबानने प्रथमच वक्तव्य केले आहे. दानिशने आमच्याकडून परवानगी घेतली नव्हती. त्यांच्या मृत्यूसाठी आम्ही जबाबदार नाही असे तालिबानने म्हटले आहे. दानिश यांचा मृत्यू क्रॉस फायरींगमध्ये झाल्याचे तालिबानने म्हटले आहे.
दानिशने आमच्याशी समन्वय केला नाही
तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद सुहैल शाहीनने खासगी वृत्तवाहिनी एनडीटीव्हीशी बोलताना यावर भाष्य केले. दानिश सिद्दीकींनी आमच्याशी संपर्क केला नव्हता. अफगाण सुरक्षा दल आणि तालिबानदरम्यानच्या संघर्षात त्यांचा मृत्यू झाला. तालिबानने त्यांना मारले असे म्हणणे चुकीचे आहे असे शाहीनने म्हटले आहे.
तालिबानने दानिशची हत्या केली नाही
तालिबानने दानिश यांची हत्या केली असे तुम्ही म्हणू शकत नाही. त्यांनी आमच्याशी समन्वय केला नाही. पत्रकार जेव्हा इथे येतील तेव्हा आमच्याशी समन्वय करा अशी घोषणा आम्ही अनेकदा केली आहे. आमच्याशी समन्वय करा आणि आम्ही तुम्हाला सुरक्षा प्रदान करू असे शाहीनने म्हटले आहे.
क्रॉस फायरींगमध्ये मृत्यू झाल्याचा दावा