इस्लामाबाद - कोविड - 19 साथीच्या रोगासंदर्भात लागू असलेल्या मानकांचे (एसओपी) उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तान सरकारने तुर्की एअरलाइन्सवर एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, सिव्हील एव्हिएशन अॅथॉरिटी ऑफ पाकिस्तानने (सीएए) गुरुवारी तुर्की एअरलाइन्सला आठवड्याभरात अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
पाकिस्तानने सर्व एअरलाइन्स ऑपरेटर्सना सल्ला दिला आहे की, त्यांनी सरकारच्या निर्देशांचे काटेकोर पालन केले पाहिजे. यामध्ये वर्ग-बी देशातील प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे. हा अहवाल प्रवास सुरू होण्याच्या आधीच्या 96 तासांच्या आतील असावा. असे न झाल्यास एअरलाईन्स बोर्डिंग पास देणार नाही, असे म्हटले आहे.
हेही वाचा -पाकिस्तान एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मधून बाहेर पडण्याची शक्यता नाहीच : अहवाल