महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानकडून 17 भारतीय मच्छीमारांना अटक

By

Published : Mar 1, 2021, 12:39 PM IST

पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी पाकिस्तानने 17 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. अरबी समुद्रात सागरी हद्दीचे कोणतेही स्पष्ट सीमांकन नसल्याने पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांचे नौदल एकमेंकाच्या मच्छीमारांना अटक करतात.

पाकिस्तान -भारत मच्छिमार
पाकिस्तान -भारत मच्छिमार

कराची - पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी पाकिस्तानने 17 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. तसेच मच्छिमारांच्या तीन बोटी ताब्यात घेतल्या आहेत. ही माहिती पाकिस्तानमधील एका एजन्सीनेच्या प्रवक्त्याने दिली. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना शनिवारी न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानच्या सागरी हद्दीतून परत जाण्याची चेतावणी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. हे मच्छिमार पाकिस्तानच्या सागरी हद्दीत होते. या मच्छिमारांना कराचीमधील मलिर या लांधी तुरुंगाता पाठवण्यात येऊ शकते.

अरबी समुद्रात सागरी हद्दीचे कोणतेही स्पष्ट सीमांकन नसल्याने पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांचे नौदल एकमेंकाच्या मच्छीमारांना अटक करतात. यापूर्वी पाकिस्तानने 23 भारतीय मच्छीमारांना अटक केली. सागरी हद्द ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत आल्याबाबत दोन वेळा इशारा देऊनही मच्छीमारी सुरूच ठेवल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आल्याचे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details