महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चीनमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान मायदेशी आणणार नाही! - कोरोना विषाणू

हा विषाणू चीनच्या बाहेर वेगाने पसरू नये, यासाठी आपणच खबरदारी बाळगली पाहिजे. चीनच्या सरकारने त्यासाठीच अद्याप कोणालाही चीनबाहेर जाण्याची परवानगी दिली नाहीये. त्यामुळे आम्हीही जगाचे हित लक्षात घेत, आमच्या नागरिकांना चीनमधून परत आणणार नाही. या संकटाच्या काळात आपण चीनसोबत आहोत, हे दाखवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांचे विशेष आरोग्य सहाय्यक जफर मिर्जा यांनी स्पष्ट केले आहे.

'Pak won't evacuate citizens from virus-hit Wuhan to show solidarity with China'
चीनमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान मायदेशी आणणार नाही!

By

Published : Jan 31, 2020, 12:55 PM IST

इस्लामाबाद- चीनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणणार नसल्याचे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे. या संकटाच्या काळात आपण चीनसोबत आहोत, हे दाखवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांचे विशेष आरोग्य सहाय्यक जफर मिर्जा यांनी स्पष्ट केले आहे. इस्लामाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

आम्हाला सध्या असे वाटते, की जे चीनमध्ये आहेत, त्यांनी चीनमध्ये राहण्यातच त्यांचे आणि देशाचे हित आहे. जागतिक आरोग्य संघटना हेच सांगत आहे, शिवाय चीनही हेच सांगत आहे. या संकटाच्या वेळी आम्ही चीनसोबत उभे आहोत. आमचाही चीनला दुजोरा आहे. त्यामुळे, चीनमधील पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. बुधवारी मिर्जा यांनी सांगितले होते, की चीनमधील पाकिस्तानच्या चार विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. जवळपास ५०० पाकिस्तानी विद्यार्थी चीनच्या वुहान प्रांतात राहत आहेत.

हा विषाणू चीनच्या बाहेर वेगाने पसरू नये, यासाठी आपणच खबरदारी बाळगली पाहिजे. चीनच्या सरकारने त्यासाठीच अद्याप कोणालाही चीनबाहेर जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्हीही जगाचे हित लक्षात घेत, आमच्या नागरिकांना चीनमधून परत आणणार नाही. तुम्ही मला नक्कीच अमेरिकेचे उदाहरण द्याल, की त्यांनी आपले नागरिक मायदेशी नेले आहेत. मात्र, त्यांनी आपले नागरिक नाही, तर सरकारी अधिकाऱ्यांना अमेरिकेत परत नेले आहे. तेही, व्हिएन्ना कन्वेंशनच्या नियमांमुळे शक्य झाले आहे. या नियमानुसार, जर एखाद्या देशाचे सरकार आपल्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या देशातून परत बोलवत असेल, तर त्यांना परवानगी द्यावी लागते, असेही मिर्जा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बुधवारी चिनी सरकारने भारतीय नागरिकांना परत नेण्यासाठी भारतीय दूतावासासोबत बोलणी सुरू केली होती. त्यानुसार, आज दुपारी एअर इंडियाचे एक विमान चीनमधील भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी रवाना होईल. ४२३ आसनक्षमता असणारे 'जम्बो बी ७४७' हे विमान दिल्लीहून निघून चीनच्या वुहान शहरात उतरेल, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. आज दुपारी निघालेले हे विमान उद्या पहाटे दोनच्या दरम्यान भारतात परत येईल. यावेळी कमीत कमी ४०० नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या विमानात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह पाच डॉक्टरांचे एक विशेष पथकदेखील असणार आहे.

हेही वाचा : 'कोरोना'चा कहर : चीनमधील बळींची संख्या २१३, तब्बल १० हजार नागरिकांना संसर्ग..

ABOUT THE AUTHOR

...view details