सेऊल :दक्षिण कोरिया अमेरिकेकडून न्यूक्लिअर इंधन घेत असल्याचा आरोप उत्तर कोरियामधील एका माध्यम संस्थेने केला आहे. यावरुन त्यांनी दक्षिण कोरियावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली आहे. न्यूक्लिअर उर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी दक्षिण कोरिया हे इंधन विकत घेत आहे असा दावा या माध्यमाने केला आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किम ह्यून-चोंग यांच्या अमेरिका भेटीवरुन या वादाला तोंड फुटले. चोंग यांची अमेरिका भेट ही अतिशय धोकादायक असून, कोरियन पेनिन्सुला प्रांतातील शांतता यामुळे नष्ट होईल. तसेच दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढेल, असे योनहॅप या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.