महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इंडोनेशियाला महापुराचा तडाखा; आतापर्यंत सोळा दगावले, हजारोंचे स्थलांतर - इंडोनेशिया राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि आसपासच्या शहरांना पुराने विळखा घातला आहे. या पुरात आत्तापर्यंत १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.

Indonesia flood
इंडोनेशियाला महापुराचा तडाखा; आतापर्यंत सोळा दगावले, हजारोंचे स्थलांतर

By

Published : Jan 2, 2020, 1:05 PM IST

Updated : Jan 2, 2020, 4:29 PM IST

जकार्ता -नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि आसपासच्या शहरांना पुराने विळखा घातला आहे. इंडोनेशियामध्ये आलेल्या पुरात आत्तापर्यंत १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर पुरामुळे हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. अजूनही शहरांमध्ये सर्वत्र पुराचे पाणी भरलेले आहे. मागील सात वर्षांतील ही सर्वांत मोठी पूर परिस्थिती आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला जकार्ता आणि वेस्ट जावा हिल्स भागांमध्ये तब्बल ३७ सेंटिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे सिलिवुंग आणि सिसाडेन या नद्यांना पूर आला.

'पीएलएन' या विद्युत वितरण कंपनीने पुरामुळे 724 भागांतील वीज पुरवठा बंद केला आहे. पूर आलेल्या भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून, स्थानिक प्रशासनालाही योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख डोनी मोनार्डो यांनी दिली.

विस्थापित केलेल्या लोकांना सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. लोकांना जेवण, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. पुरामुळे पूर्व जकार्तातील हालीम विमानतळ हे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळावर साधारणपणे १९ हजार प्रवासी अडकून पडले आहेत.

हेही वाचा - 'व्हिजिट नेपाळ 2020' पर्यटन मोहिमेची सुरुवात

Last Updated : Jan 2, 2020, 4:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details