महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नेपाळमध्ये पावसाचा कहर! मृतांचा आकडा ५० वर, ३३ बेपत्ता

राजधानी काठमांडूमध्येही काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर, पूर्वेकडील खोतांग जिल्ह्यात भूस्खलन होऊन आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नेपाळ

By

Published : Jul 14, 2019, 9:58 AM IST

Updated : Jul 14, 2019, 2:44 PM IST

काठमांडू -नेपाळला वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३३ जण बेपत्ता आणि २५ जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक नद्यांचे तट तुटले असून जवळच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे. अनेक महामार्गांवरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

नेपाळ आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख बेद निधी खानल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'देशात २०० हून अधिक भागात पावसाचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागात अन्न आणि इतर उपयोगी साहित्य पोहोचवले जात आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.'

राजधानी काठमांडूमध्येही काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर, पूर्वेकडील खोतांग जिल्ह्यात भूस्खलन होऊन आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Last Updated : Jul 14, 2019, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details