नवी दिल्ली/ कीव :रशिया-युक्रेन संघर्षामुळे( Russia Ukraine conflict ) बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना आज राजधानी कीव सोडण्याचा ( Leave Kyiv Urgently ) सल्ला दिला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने (Indian Embassy in Ukraine Tweet) ट्विट केले की, 'कीवमधील विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी तात्काळ कीव सोडावे. ट्रेनसह उपलब्ध कोणत्याही मार्गाने कीव सोडा, असा सल्ला दूतावासाने दिला आहे.
युक्रेनमध्ये भारतीयाचा मृत्यू
युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ( Indian Student Killed in Ukraine ) झाला आहे. युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीटकरुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे.
ऑपरेशन गंगा
दरम्यान, 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी भारतीय हवाई दलाला (IAF) यात सहकार्य करण्याने सांगितले आहे. "आमच्या हवाई दलाच्या क्षमतेचा उपयोग केल्यास लोकांना कमी वेळेत बाहेर काढता येईल. असे सूत्रांनी सांगितले. भारतीय हवाई दल ऑपरेशन गंगा अंतर्गत मंगळवारपासून अनेक सी-17 विमाने तैनात करणार आहे. तब्बल 14,000 भारतीय नागरिक अजूनही युक्रेनमध्ये आहेत. IAF निर्वासित योजनेसह सज्ज असून, कीव, खार्किव आणि ओडेसा येथे हजारो भारतीयांची सुटका करेल.
1600 भारतीयांची सुटका
C-17 ग्लोबमास्टर IAF वाहतूक विमानांमध्ये प्रवासी वाहून नेण्याची क्षमता जास्त आहे. नागरी विमान कंपन्यांच्या तुलनेत युक्रेनच्या शेजारील देशांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ शकते. पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या या मोहिमेचे निरीक्षण करत आहेत. आणि त्यांनी सोमवारी संध्याकाळपर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत. मंगळवारपर्यंत 1600 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनमधून सुटका करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले सुरूच आहेत.
हेही वाचा -Russia-Ukraine Crisis : रशियाने व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा युक्रेनचा आरोप