महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 12, 2021, 12:14 PM IST

ETV Bharat / international

#MalalaDay : शिक्षणासाठी तालिबान्यांच्या गोळीलाही भीक न घालणारी निर्भीड 'मलाला'

सर्वात कमी वयाची नोबेल विजेती मलाला युसूफझाई हिचा आज जन्मदिन. संयुक्त राष्ट्रांतर्फे हा दिवस 'मलाला दिन' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मलालाला शांततेचा 2014 सालचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती होती.

malala
मलाला

नवी दिल्ली - दरवर्षी 12 जुलै हा दिवस जगभरात 'मलाला दिन' म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या जगभरातील चळवळींचा मलाला एक चेहरा आहे. मलालाला शांततेचा 2014 सालचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती होती. प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळावा हे मलालाचे युसूफझाईचे उद्दीष्ट आहे.

वर्ष 2013 मध्ये 12 जुलै रोजी मलालाने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात भाषण दिले होते. यावेळी तीने शिक्षणासाठी स्त्री-पुरुष समानता किती महत्त्वाची आहे, याबाबत आपली मतं व्यक्त केली होती. तीचे भाषण ऐकूण जागतिक नेत्यांनी उभे राहून तिचे कौतुक केले होते. यात विशेष म्हणजे मलालाचा वाढदिवसही 12 जुलैला असतो. तेव्हापासून मलालाच्या सन्मानार्थ 'मलाला दिन' साजरा केला जात आहे.

मलाला यूसुफजईचा जन्म 12 जुलै 1997 रोजी पाकिस्तानच्या मिंगोरा येथे झाला होता. जे आता पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सर्वात मोठे शहर आहे. मलाला ही जियाउद्दीन युसुफझाई आणि तोर पेकाई यूसुफझाई यांची कन्या आहे. तीला दोन धाकटे भाऊ आहेत. मलालाचे कुटुंब पश्तून वंशाचे सुन्नी मुस्लिम आहे.

मलाला पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात शाळेत असताना शिक्षण प्रसाराचे काम करत होती. ब्लॉगच्या माध्यमातून पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणाआड येणारा दहशतवादाचा भेसूर चेहरा तीने बेधडकपणे जगासमोर आणत होती. तालिबानच्या महिलांच्या शिक्षणाला विरोध असतानाही ती काम करत होती. सर्व प्रकारचे धोके पत्करून मलालाने न घाबरता शैक्षणिक सुरूच ठेवले. यामुळे दहशतवाद्यांनी 9 ऑक्टोबर 2012 ला मलालाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तालिबानी दहशतवाद्यांनी शाळेत जाताना तिच्या मानेत गोळी झाडली. या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. तीच्या कार्याची दखल घेत तीला 2014 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती होती. जगभरातून तीच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. तर 2012 मध्ये पाकिस्तान सरकारने मलालाला प्रथम राष्ट्रीय युवा शांती पुरस्कार प्रदान केला होता.

मलाला फंड -

जगभरात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने मलालाने 'मलाला फंड' या ट्रस्टची स्थापना केली आहे. निडर आणि महत्त्वाच्या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्राने मलालाला 'शांतीदूत' हा पुरस्कार घोषित केला आहे. मलाला यूसुफजईने ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे.

कॅनडाचे मानद नागरिकत्व -

पाकिस्तानी समाजसेविका आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाईच्या जीवनावर आधारित 'गुल मकाई' हा बायोपिक दिग्दर्शक अमजद खान यांनी तयार केला आहे. सध्या मलाला परिवारासोबत इंग्लडमध्ये वास्तव्यास आहे. मलालाला कॅनडाचे मानद नागरिकत्व मिळालेले आहे. कॅनडामधील हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधणारी ती सर्वात तरुण व्यक्ती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details