टोकियो : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये एका महिन्यासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. टोकियो आणि इतर सहा प्रांतांमध्ये कोरोनाविरुद्धचा लढा अधिक जोमाने करण्याबाबात पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी घोषणा केली.
लॉकडाऊन नाही..

आणीबाणीबाबत घोषणा करतानाच अॅबे यांनी असे जाहीर केले, की युरोपीय देशांप्रमाणे जपानमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. या आणीबाणीमध्ये टोकियोचे टोकियोचे राज्यपाल आणि इतर सहा प्रांतांचे प्रमुख यांच्याकडे ही जबाबदारी असेल, की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना सोशल डिस्टन्सिंगसाठी प्रोत्साहित करावे. हे प्रमुख लोकांना केवळ याबाबत विनंती करतील. लोकांवर त्याची सक्ती नसणार आहे, तसेच लोकांनी त्याचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाईही होणार नाही.
जपानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३,९०६ रुग्ण आढळून आले आहेत. तर सुमारे ९२ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत पाचशेहून अधिक लोकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा :ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन कोरोना पॉझिटिव्ह, आयसीयूत दाखल