नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करण्याची जबाबदारी पाकिस्तान नेहमीप्रमाणे टाळत आहे. कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला ते अजूनही संरक्षण देत आहेत. यावरून भारताकडून पाकिस्तानवर टीका करण्यात आली आहे.
14 फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर दीड वर्षे तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे. दहशतवादाच्या कृत्याची दखल घेण्यासाठी आणि अशा भयंकर गुन्हेगाराच्या दोषींना न्यायासमोर आणण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आला आहे. आमचे उद्दिष्ट फक्त निवेदने किंवा अधिसूचना जारी करणे नव्हे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व पाकिस्तानमध्ये होते आणि त्याचे पुरेसे पुरावे त्यांना दिले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.