महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

स्वच्छता : जपानचे सर्वोच्च प्राधान्य!

जपान कोरोना विषाणुचे जन्मस्थान असलेल्या चीनच्या अगदी निकट असला तरीही, तेथे या महामारीचा परिणाम तितकासा जास्त झालेला नाही. याचे मुख्य कारण स्वच्छता हा जपानी संस्कृतीचा भाग आहे, हे आहे. वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ सभोवतालीचा परिसर हे जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचा भाग आहेत.

Hygiene: Japan's High priority!
स्वच्छता : जपानचे सर्वोच्च प्राधान्य!

By

Published : Apr 5, 2020, 8:31 PM IST

जपान हा कोरोना विषाणुचे जन्मस्थान असलेल्या चीनच्या अगदी निकट असला, तरीही तेथे या महामारीचा परिणाम तितकासा जास्त झालेला नाही. याचे मुख्य कारण स्वच्छता हा जपानी संस्कृतीचा भाग आहे, हे आहे. वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ सभोवतालीचा परिसर हे जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचा भाग आहेत. कोरोनाच्या संसर्गाच्या दिवसात आम्ही मास्क घातलेले पहात आहोत. पण जपानी लोक एरवीही साधी सर्दी झाली तरीही आवर्जून मास्क चढवतात. प्रथमच जपानला भेट देणार्यांना याचे आश्चर्य वाटते आणि जपानी स्वच्छतेच्या उच्च दर्जाने ते प्रभावित होतात.

जपानमधील एक शाळा..

त्या दिवसाचे वर्ग संपले होते. शिक्षकांनी दुसऱ्या दिवसाच्या वेळापत्रकाची काही घोषणा केली. त्या दिवसाच्या स्वच्छतेच्या कर्तव्याबद्दल, शिक्षकांनी असे जाहीर केले, की पहिल्या दोन रांगांमधील विद्यार्थी वर्गखोली स्वच्छ करतील. तिसऱ्या आणि चौथ्या रांगांतील विद्यार्थी कॉरिडॉर आणि जिने स्वच्छ करतील. जे पाचव्या रांगेत आहेत ते शौचालये स्वच्छ करतील. त्वरित, सर्व विद्यार्थी झाडू आणि बकेट्स घेऊन बाहेर गेले. देशभरातील सर्व शाळांमधील ही नेहमीची पद्धत आहे. जपानी वैयक्तिक आणि पर्यावरणीय स्वच्छतेला त्यांच्या संस्कृतीचा अत्यंत महत्वाचा भाग समजतात आणि आपल्या मुलांना लहानपणापासूनच स्वच्छतेबाबत प्रशिक्षित करतात.

हीच सवय सर्वत्र..

केवळ शाळांपुरतीच ही सवय मर्यादित नाही. घरीही आईवडील आपल्या मुलांना स्वच्छतेबाबत कर्तव्य म्हणून शिकवतात. शाळेत किंवा घरात प्रवेश करताच, ते आपले बूट काढतात आणि ते एका लॉकरमध्ये ठेवतात. नंतर ते वेगळी पादत्राणे घालून आत जातात. या सवयीमुळे त्यांना बाहेरची धूळ आत येण्यापासून रोखण्यास मदत होते आणि आत संक्रमण होत नाही. जपानमधील पर्यटकांचे मुख्य मुख्य आकर्षण असलेली बुलेट ट्रेन (शिंकानसेन) लोक स्वयंसेवक बनून स्वच्छ करतात. संगीत कार्यक्रमांसारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्येही, ते अगदी आवर्जून कचरा हा त्यासाठी असलेल्या कॅन्समध्येच फेकतात. धूम्रपान करणारे आपल्यासमवेत राख झटकण्यासाठी असलेले लहान ट्रे बाळगतात.

क्रीडा क्षेत्रात..

सहसा खेळ पहाण्यासाठी स्टेडियमला भेट देणारे प्रेक्षक, खेळात कोणत्या प्रकारच्या गोष्टी आणतात, याची पर्वा करत नाहीत. पण जपानींचे खेळाप्रती असलेली आत्मीयता एकमेव आहे. ब्राझीलमध्येही २०१४ आणि २०१८मध्ये रशियात विश्वकरंडकाच्या वेळेस असे पहाण्यात आले होते. खेळ संपल्यावर प्रेक्षक स्टेडियम स्वच्छ केल्यानंतरच बाहेर पडतात. जपानी खेळाडूही आपापल्या ड्रेसिंग रूम स्वच्छ केल्यांनंतरच बाहेर पडतात.

कार्यालयांतील स्वच्छता..

जपानी लोकांच्या दैनंदिन जीवनात सामाजिक सद्सद्वविवेक प्रामुख्याने स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ, सकाळी आठ वाजता कार्यालयात जाणारे आणि व्यावसायिक लोक शेजारचे रस्ते स्वच्छ करतात. कॉलन्यांमधून रहाणारे नियमितपणे रस्ते स्वच्छ करण्याची प्रक्रिया पार पाडतात.

ट्रेमध्ये नोटा..

जपानमध्ये एटीएममधून दिल्या जाणाऱ्या नोटाही अतिस्वच्छ असतात. नोटा वेगवेगळ्या हातांतून जात असल्याने, अनेक अशुद्ध गोष्टी त्यांना चिकटत असतात. त्यामुळे जपानमध्ये कुणाच्याही हातात नोटा थेट ठेवल्या जात नाहीत. दुकाने, हॉटेल्स आणि अगदी टॅक्सीमध्येही विशेष ट्रे असतात. पैसे त्यात ठेवले जातात.

विषाणुला रोखणे..

सर्दी आणि फ्ल्यू झालेले सर्जिकल मास्क तर आवर्जून घालतात. त्यांच्यापैकी बहुतेक जण आपला संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी अत्यंत सावध असतात.या साध्या तत्वामुळे विषाणुचा प्रसार होत नाही. यामार्गाने देश आजारी रजा आणि वैद्यकीय खर्चावरील कितीतरी पैसा वाचवतो. जपानमध्ये जवळपास सर्व सुपरमार्केट्समध्ये आणि गृहोपयोगी वस्तुंच्या दुकानात सर्जिकल मास्क उपलब्ध असतात. जपानी सरकारने शाळा बंद केल्या असून कोरोना साथीच्या उद्रेकाला आळा घालण्य़ासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र दुकाने आणि हॉटेल्स उघ़डे ठेवाय़ला परवानगी दिली आहे. त्यांच्या स्वच्छतेबाबतच्या आत्मविश्वासामुळे हा निर्णय असावा.

हेही वाचा :कोरोनाच्या संकटामुळे ५२ टक्के नोकऱ्या गेल्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details