काबूल - अफगाणिस्तान तालिबानच्या हाती गेले असून तिथे अराजकता पसरली आहे. गेल्या गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर स्फोट झाला. यात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, लोक जिवाची पर्वा न करता पुन्हा विमानतळावर गर्दी करत आहेत. लोकांमध्ये मृत्यूपेक्षा तालिबान्यांची भीती जास्त दिसून येत आहे. प्रत्येक जण मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेची निर्वासन मोहीम 31 ऑगस्टला संपणार असून यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अमेरिकेकडून आपले निर्वासन होईल, अशी आशा नागरिकांना असून ते विमानतळाबाहेर गर्दी करत आहेत.
नागरिक विमानतळाबाहेर गर्दी करत असल्याचे दहशतवादी हल्ल्याची शक्यता आणखी वाढली आहे. विमानतळावर पुन्हा एकदा हल्ला होऊ शकतो, असे गुप्तचर संस्थाकडून सांगण्यात येत असल्याची माहिती आहे. यासाठी नागरिकांनी विमानतळाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन अमेरिकन सैन्याने केले आहे. मात्र, अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळ हाच एकमेव मार्ग असल्याने नागरिक आपल्या कागदपत्रांसह विमानतळाबाहेर जमा होत आहेत.
विमानतळाबाहेर होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत इस्लामिक स्टेट खुरासानने दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवले. यात 169 अफगाण नागरिक आणि अमेरिकेच्या 13 सैनिकांचे प्राण गेले आहेत. अमेरिकेने आपल्या सैनिकांच्या मृत्यूचा 48 तासांच्या आत बदला घेतला आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नंगरहार येथे ISIS-K चं तळ आहे. या तळावर अमेरिकेन सैन्याने ड्रोनद्वारे हल्ला केला. लक्ष्य प्राप्त केले असून या मिशिनमध्ये कोणत्याही सामान्य नागरिकाची हानी झाली नाही, असे यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले.
31 ऑगस्टपर्यंत निर्वासन पूर्ण करण्यावर अमेरिकेचा फोकस -