महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चीनमध्ये लागलेल्या भीषण आगीत १९ जणांचा मृत्यू - Factory fire China

ग्राहक सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.

चीनमध्ये लागलेल्या भीषण आगीत १९ जणांचा मृत्यू

By

Published : Sep 30, 2019, 9:10 AM IST

झीझिंग (चीन) - ग्राहक सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. पूर्व चीनमधील झीझिंगमध्ये रविवारी ही घटना समोर आली. चीनमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजता ही आग लागली.

हेही वाचा -चीनमध्ये भीषण अपघातात ३६ जणांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी

स्थानिक आग्निशामक दल आणि बचाव पथकाने प्रसंगावधान दाखवत वेगात बचावकार्य आणि आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार १९ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा -अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इसिसचे ८ दहशतवादी ठार

ABOUT THE AUTHOR

...view details