महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इंडोनेशियात अतिवृष्टीने पूर परिस्थिती; ७७ ठार - flood

पुराच्या पाण्यामुळे या भागातील घरे जमीनदोस्त झाली आहेत. भूस्खलन, झाडे उन्मळून पडल्याने परिसरातचे भरपूर नुकसान झाले आहे.

इंडोनेशियात अतिवृष्टीने पूर परिस्थिती

By

Published : Mar 20, 2019, 8:18 PM IST

जकार्ता - इंडोनेशियाच्या पूर्व भागातील पापुआ प्रांतात अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली असून यामध्ये सुमारे ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७७ पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

पुराच्या पाण्यामुळे या भागातील घरे जमीनदोस्त झाली आहेत. भूस्खलन, झाडे उन्मळून पडल्याने परिसरातचे भरपूर नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे आणि रस्त्यावर चिखल साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, या परिसरात जाणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात आल्या आहेत. इंडोनेशियाला पावसाळ्याच्या दिवसांत सतत पुराचा सामना करावा लागतो. जानेवारी महिन्यात सुलावेसी बेटावर आलेल्या पुरात ७० जणांचा मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details