कोलंबो - श्रीलंकेत कोलंबोमध्ये ईस्टर संडेनिमित्त चर्चमध्ये एकत्र आलेल्या ख्रिस्ती भाविकांवर आणि ३ हॉटेल्सवर बॉम्ब हल्ले झाले. या साखळी बॉम्बस्फोटांनंतर चारच दिवसात आज पुन्हा एक स्फोट झाला. राजधानी कोलंबोपासून पूर्वेला ४० किलोमीटरवर असलेल्या पुगोडा शहरात हा स्फोट झाला आहे. पोलीस प्रवक्ते रुवान गुणशेकेरा यांनी कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती दिली.
श्रीलंकेत आणखी स्फोट; कोलंबोपासून ४० किलोमीटरवर पुगोडा शहरात बॉम्बस्फोट
पुगोडामध्ये मजिस्ट्रेट कोर्टाच्या मागे रिकाम्या जागेत हा स्फोट झाला. पोलीस प्रवक्ते रुवान गुणशेकेरा यांनी कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती दिली.
श्रीलंकेत आणखी स्फोट
पोलीस आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुगोडामध्ये मजिस्ट्रेट कोर्टाच्या मागे रिकाम्या जागेत हा स्फोट झाला. पोलीस या स्फोटाचा तपास करत आहेत. ईस्टरदिवशी झालेल्या बॉम्ब हल्ल्यांत एकूण ३५९ लोक मृत्युमुखी पडले होते. तर, ५०० हून अधिक जखमी झाले होते.