नवी दिल्ली / काबूल -अफगाणिस्तानात हिंदुकुश पर्वत रांगांमध्ये ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. ६.३ इतक्याच तीव्रतेचे भूकंपाचे हादरे दिल्ली आणि उत्तर भारतातही जाणवले. तसेच, पाकिस्तानातही या भूकंपाचे धक्के बसले आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास हा भूकंप झाला.
संयुक्त राष्ट्र भूगर्भशास्त्र सर्वेक्षणाच्या (यूएसजीएस) अहवालानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य अफगाणिस्तानातील जार्म प्रांताच्या ५१ किलोमीटर नैऋत्येकडे असल्याची नोंद झाली आहे. तर, हे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली २१० किलोमीटरवर असल्याचेही संस्थेने सांगितले आहे.