महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जपानमध्ये ५.५ रिश्टर स्केलचा भूकंप, जीवितहानी नाही - japan

जपानचा हा भाग 'रिंग ऑफ फायर' या प्रदेशात येत असल्यामुळे या प्रदेशात नेहमी भूकंप होत राहतात. पॅसिफिक समुद्रात हा भाग येतो.

भूकंप

By

Published : May 15, 2019, 3:41 PM IST

Updated : May 15, 2019, 5:15 PM IST

अमामी ओशिमा - जपानमधील अमामी ओशिमा या बेटावर ५.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जपान येथील हवामान खात्याच्या माहितीनुसार, पहाटे २:३४ वाजता हा भूकंप झाला. याचे केंद्र समुद्रसपाटीपासून ३० किलोमीटर खोलीवर होते. मात्र, यामुळे त्सुनामी येण्याची शक्यता नाही.

जपानचा हा भाग 'रिंग ऑफ फायर' या प्रदेशात येत असल्यामुळे या प्रदेशात नेहमी भूकंप होत राहतात. पॅसिफिक समुद्रात हा भाग येतो.

२०११ मध्ये जपानमध्ये ९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामुळे अत्यंत शक्तिशाली त्सुनामींचे संकट निर्माण झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. देशाच्या इतिहासातील हा अत्यंत शक्तिशाली भूकंप असून १५ हजारांहून अधिक लोक मारले गेले होते.

Last Updated : May 15, 2019, 5:15 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details