लखीमपूर खेरी - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील पालिया कलान पोलीस ठाण्यामध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे. मंगळवारी ४२ जणांच्या समुहाने पोलीस ठाणे गाठून हे निवेदन सोपवले आहे.
कोरोना इफेक्ट : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याविरोधात यूपीच्या लखीमपूर पोलीसात तक्रार - corona in india
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील पालिया कलाण पोलीस ठाण्यात मंगळवारी ४२ जणांच्या समुहाने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भारतात दिवसेंदिवस कोरोना संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर खबरदारी म्हणून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. महासत्ता होण्यासाठी चीनने हे कोरोना विषाणूचे षडयंत्र रचले आहे. भारतामध्येही याचा प्रसार होऊन लॉक डाऊन घोषित केल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यावर झाला आहे. अनेकांचे रोजगार हिरावले, आमच्या सर्व व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याचे त्यांनी या निवेदनाद्वारे म्हटले आहे.
विषेश म्हणजे, बिहारमधील मुझफ्फरपूर येथेही चीनचे राष्टपती जिनपिंग आणि भारताचे चीनचे राजदूत सन वेडोंग यांच्याविरूद्ध कोरोना विषाणू पसरविल्याच्या आरोपावरून मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी 11 एप्रिल रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) च्या कोर्टात होणार आहे. तर, लखीमपूर खेरी येथे सादर करण्यात आलेल्या निवेदनपर तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.