नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा 8 लाखांच्या पुढे गेला आहे. तर 39 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण परिस्थितीतही दिलासा देणारी बातमी म्हणजे 1 लाख 72 हजार रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे.
जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांच्या पुढे; 39 हजार दगावले
इटलीमध्ये 11 हजार तर स्पेनमध्ये 8 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर युरोपात कोरोनाने थैमान घातले आहे.
इटलीमध्ये 11 हजार तर स्पेनमध्ये 8 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर युरोपात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिकेत 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना संसर्ग झाला आहे. तर 3 हजार 175 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीमध्येही सुमारे 67 हजार नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
चीनमध्ये प्रथम आढळून आलेला कोरोना विषाणू आता जगातील प्रत्येक खंडामध्ये पोहोचला आहे. त्यामुळे जागतिक व्यापार, उद्योगधंदे, व्यवहार, प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि एकंदरीत जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक देशांनी लॉकडाऊनसह आरोग्य आणीबाणी जारी केली आहे. सगळ्याच देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मास्क, आरोग्य सुरक्षा उपकरणे, व्हेंटिलेटर, गोळ्या औषधांची कमतरता भासू लागली आहे. भारतातही कोरोनाचे 1251 रुग्ण आढळून आले आहेत.