महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

...म्हणून चीन भारतातून डुकराचे मांस आयातीवर घालणार बंदी - आफ्रिकी स्वाईन फ्लू

आफ्रिकन स्वाईन फ्लू टाळण्यासाठी भारतातून डुकराचे मांस आयातीवर चीन बंदी घालणार आहे. आफ्रिकेच्या स्वाइन फ्लूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीनने हे पाऊल उचलले आहे.

आफ्रिकी स्वाईन फ्लू
आफ्रिकी स्वाईन फ्लू

By

Published : May 29, 2020, 3:04 PM IST

बिंजिग - भारतात कोरोना पाठोपाठ आता आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यावर आफ्रिकन स्वाईन फ्लू टाळण्यासाठी भारतातून डुकराचे मांस आयातीवर चीन बंदी घालणार आहे. आफ्रिकेच्या स्वाइन फ्लूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीनने हे पाऊल उचलले आहे.

डुक्कर, वन्य डुक्कर आणि संबंधित उत्पादनांच्या आयातीवर चीन बंदी घालणार आहे. आसाममध्ये आजाराने 14,000 हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग संस्थान (एनआयएचएसएडी), भोपाळने आसाममधील डुक्कारांना अफ्रीकी स्वाइन फ्लू (एएसएफ) असल्याचे सांगितले आहे. राज्य विभागाच्या 2019 च्या जनगणनेनुसार आसाममधील डुक्करांची संख्या 21 लाख होती, परंतु अलिकडच्या काळात ती 30 लाखांवर गेली आहे.

स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा या रोगाचा एक प्रकार आहे, हा सामान्यतः डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुकरांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, अर्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.

ABOUT THE AUTHOR

...view details