काबूल- अफगाणिस्तानातील परवान प्रांत बॉम्बस्फोटाने हादरला आहे. राष्ट्रपती अश्रफ घनी एका रॅलीला संबोधीत करत असताना हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. एका आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला. तसचे अफगाणिस्तानातील काबूल शहरातही दुसरा स्फोट झाला.
अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले; ८ जणांचा मृत्यू, १० जखमी
अफगाणिस्तानातील परवान प्रांत बॉम्ब स्फोटाने हादरले आहे.
परवान प्रांतात बॉम्बस्फोट
सुरुवातीला पोलिसांनी परवान प्रांतात झालेल्या स्फोटात २४ जणांचा मृत्यू आणि ३० जण जखमी झाल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर पुन्हा एकदा पोलिसांनी मृत आणि जखमी लोकांची आकडेवारी दिली. पहिल्या स्फोटानंतर काबूल शहरामध्ये दुसरा बॉम्बस्फोट झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. दुसरा हल्ला अमेरिकेच्या दुतावासाजवळ झाल्याची माहिती मिळत आहे.