महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अल कायदाची तालिबानशी जवळीक राहणारच - संयुक्त राष्ट्र अधिकारी - अमेरिका-तालिबान शांतता करार न्यूज

संयुक्त राष्ट्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल कायदा नेता अयमन अल-जवाहिरीने अफगाण तालिबानशी जवळीकीचे संबंध तसेच ठेवले आहेत, असे सांगितले. 'अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांतील मोठे नेते आणि त्यांच्याकडे असलेले शेकडो दहशतवादी अजूनही तेथे आहेत,' असे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे.

अफगाण तालिबान लेटेस्ट न्यूज
अफगाण तालिबान लेटेस्ट न्यूज

By

Published : Oct 21, 2020, 3:56 PM IST

काबुल -संयुक्त राष्ट्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल कायदा नेता अयमन अल-जवाहिरीने अफगाण तालिबानशी जवळीकीचे संबंध तसेच ठेवले आहेत, असे सांगितले. जवाहिरीने अफगाण तालिबानशी असलेले संबंध संपवण्याचे आश्वासन अमेरिकेला दिले होते, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

'अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांतील मोठे नेते आणि त्यांच्याकडे असलेले शेकडो दहशतवादी अजूनही तेथे आहेत,' असे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे. आयएस, अल कायदा आणि तालिबानवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले अमेरिकन पर्यवेक्षण टीमचे समन्वयक एडमंड फिटन-ब्राउन यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

हेही वाचा -लिबियाच्या सामूहिक कबरींमध्ये सापडले 12 मृतदेह

तालिबान अमेरिकेसह चालू असलेल्या शांतता संभाषणाच्या वेळी नियमितपणे अल कायदासोबतही चर्चा करण्यात आली, असेही फिटन-ब्राउन यांनी सांगितले.

दरम्यान, टोलो न्यूजला पाठवलेल्या एका संदेशात तालिबानने संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांकडून केले जाणारे दावे खोडून काढले आहेत. काही गुप्तपणे काम करणारे समूह अफगाणिस्तानमध्ये शांततेच्या मार्गात अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे तालिबाबनने म्हटले आहे.

29 फेब्रुवारीला दोहामध्ये तालिबान आणि अल कायदा अशा दोघांनीही अमेरिका-तालिबान शांतता करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत तालिबानने अल कायदासह सर्व दहशतवादी संघटनांशी असलेले सर्व प्रकारचे संबंध संपवण्याची हमी दिली होती.

हेही वाचा -मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 'भीती'च्या अस्त्राचा वापर

ABOUT THE AUTHOR

...view details