काबुल -काबुल सरकार आणि तालिबान यांच्यात शांतता करारासाठी बोलणी सुरू असतानाच अफगाणिस्तानात हिंसाचाराची स्थिती पसरली आहे. मागील 24 तासांदरम्यान देशातील 34 पैकी 28 प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा प्रयत्न झाला आहे. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.
हेही वाचा -काही शक्तींचा पाकिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न : कुरेशी
टोलो न्यूजने मंत्रालयाचे प्रवक्ते रोहुल्ला अहमदझई यांच्या हवाल्याने सांगितले की, तालिबान्यांनी गेल्या 24 तासांत 28 प्रांतांमध्ये सुरक्षा दलांच्या चौक्या आणि इतर ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारी सैन्याने त्यांचे हल्ले परवून लावत त्यांचे मोठे नुकसान केले.
गेल्या महिन्यात, तालिबान्यांनी हेलमंद प्रांतातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लश्करगाह शहराच्या मध्यभागी जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात हजारो लोक बेघर झाले.
हेही वाचा -अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यात 50 दिवसात 261 नागरिकांचा मृत्यू