काबुल- तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये विविध प्रांतावर कब्जा घेण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तान सरकारने तालिबानी दहशतवाद्यांचा पराभव करण्यासाठी तीन टप्प्यात नियोजन केले आहे.
अफगाणिस्तानचे केंद्रीय गृहमंत्री जनरल अब्दुल सत्तार मिर्झाकवाल म्हणाले, की देशातील 1,30 हजार पोलीस दलांचा प्रभार हा पाच आठवड्यापूर्वी घेतला. आम्ही तीन टप्प्यांत काम करत आहोत. पहिल्या टप्प्यात सरकारी सैन्यदलाचा पराभव टाळणे, दुसऱ्या टप्प्यात सुरक्षा दल एकत्रित करून शहराभोवती वेढा तयार करणे आहे. तिसऱ्या टप्प्यात कठोर मोहिम राबविणे आहे. या स्थितीला आम्ही दुसऱ्या टप्प्याच्या दिशेने जात आहोत.
हेही वाचा-गोवा : कलंगुट समुद्रकिनारी आढळला तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह
तालिबानी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी अफगाणिस्तान सरकारचे प्रयत्न
अपरायझिंग मुव्हमेंट ही स्थानिक स्वयंसेवकांचे लष्कर आहे. या लष्कराने तालिबानींविरोधात विविध प्रांतात भाग घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील नऊ प्रांतामध्ये ताबा घेतला आहे. अफगाणिस्तान सरकार हे महामार्ग, मोठ्या शहरांमध्ये महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच तालिबानी दहशतवाद्यांना सीमारेषा ओलांडून शहरे ताब्यात रोखण्यावर अफगाणिस्तान सरकार लक्ष केंद्रित करत आहे.
हेही वाचा-दुहेरी दणका! राहुल गांधींच्या अकाउंटवर कारवाई केल्यानंतर काँग्रेसचे अधिकृत ट्विटर बंद
अपरायझिंगच्या लष्कराचा अफगाणिस्तान सरकारला पाठिंबा-
अपरायझिंगच्या लष्कराने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि अफगाणिस्तान सरकारला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. अपरायझिंगचे लष्कर हे सरकारी सुरक्षा दलाबरोबर तालिबांनीविरोधात लढा देत आहे. अपरायझिंगचे लष्कर वाढत असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यांचे सर्व सदस्य हे आपोआपा राष्ट्रीय सुरक्षा दलामध्ये विलीन होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.