तैपेई -दक्षिण तैवानमधील काउशुंग शहरातील एका १३ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, 41 जण जखमी झाले आहेत. गुरुवारी, स्थानिक वेळ पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले होते. आता आग नियंत्रणात आली आहे.
46 जणांचा मृत्यू -
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीची भीषणता पाहता मदत आणि बचाव कार्यासाठी जवळ ३५० अधिक जवानांची मदत घेतली गेली. या आगीमध्ये जवळपास ४६ जणांचा मृत्यू तर ४१ जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आगीच्या ठिकाणावरून 32 मृतदेह थेट शवागारात पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इतर 14 जणांनासह एकुण 55 जणांना रुग्णालयात नेण्यात आले. तैवानमध्ये, मृत्यूची अधिकृत पुष्टी केवळ रुग्णालयात केली जाऊ शकते.