महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चीनमध्ये भीषण अपघातात ३६ जणांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी - जिआंगसू अपघात

चीनमधील जिआंगसू प्रांतात भीषण अपघातामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले असून ३६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

प्रतिकात्मक फोटो

By

Published : Sep 29, 2019, 10:05 AM IST

बिजिंग - चीनमधील जिआंगसू प्रांतात भीषण अपघातामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले असून ३६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. प्रवाशांनी गच्च भरलेली बस एका ट्रकवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. बसचा टायर फुटल्याने बस ट्रकवर जाऊन आदळल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

६९ प्रवाशांना घेऊन बस जिआंगसू प्रांताच्या पुर्वेकडील महामार्गावरुन जात होती. त्यावेळी बस एका मालवाहू ट्रकला जाऊन धडकली. बसचा पुढील बाजूचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अपघातानंतर बचाव आणि मदत कार्य हाती घेण्यात आले होते. त्यानंतर चांगचून -शेनझेन महामार्ग आठ तासानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.

चीनमध्ये भीषण अपघात कायमच होत असतात. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होते. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार २०१५ या एका वर्षात ५८ हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाले आहेत. चीनमध्ये 90 टक्के अपघात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने होताता.

ABOUT THE AUTHOR

...view details