इस्लामाबाद - पाकिस्तानातील सिंध प्रांतात रेल्वे आणि बस अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रोहरी रल्वे स्टेशनवर पॅसेंजर रेल्वेने एका प्रवासी बसला धडक दिली. हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा झाला.
पाकिस्तानामध्ये रेल्वे आणि बसचा भीषण अपघात; 30 जणांचा मृत्यू
गंभीर जखमी झालेल्यांची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान एक्सप्रेस रेल्वे कराचीवरुन रावळपिंडीला जात असताना हा अपघात झाला.
गंभीर जखमी झालेल्यांची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान एक्सप्रेस रेल्वे कराचीवरुन रावळपिंडीला जात असताना हा अपघात झाला. 'अपघात अतिशय भयंकर असून बसचे तीन तुकडे झाले आहेत. अपघातानंतर बस रेल्वेबरोबर दिडशे ते दोनशे फूट लांब फरपटत गेली', असे सक्कर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी जामिल अहमद यांनी सांगितले.
रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा गेट नसलेल्या स्थानकावर हा अपघात झाला. घटनेनंतर पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखले केले. अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ६० पेक्षा जास्त नागरिकांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.