महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मुस्लीम देशांनी शिनजियांगमधील चीनच्या कृत्याचा निषेध करावा, अमेरिकेचे आवाहन

अमेरिकेने आपला वार्षिक मानवाधिकार अहवाल जारी केला आहे. यात, शिनजियांगमध्ये चीनने मुस्लीम अल्पसंख्यक समुहांच्या सदस्यांना सामूहिकपद्धतीने ताब्यात घेण्याचे अभियान अधिक तीव्र केल्याचे म्हटले आहे.

केली क्यूरी

By

Published : Mar 14, 2019, 5:58 PM IST


जिनेव्हा - चीन शिनजियांग प्रांतातील उइगरो आणि इतर मुस्लीम अल्पसंख्यकांसोबत कठोरतेने वागत आहे. चीनच्या या आचरणाविरोधात एकत्रितपणे पावले उचलण्यात मुस्लीम राष्ट्रांच्या हतबलतेवर अमेरिकेने निराशा व्यक्त केली आहे.

यावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑफिस ऑफ ग्लोबल क्रिमिनल जस्टिसच्या प्रमुख तथा अमेरिकेच्या राजदूत केली क्यूरी म्हणाल्या, 'शिनजियांगमधील घटनांसंदर्भात ओआयसीच्या (इस्लामिक सहकार्य संघटना) सदस्यांकडून योग्य प्रतिक्रिया न मिळाल्याने आणि उघडपणे विरोध न केल्याने आम्ही निराशा झालो आहोत.’

जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अमेरिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमापूर्वी क्यूरी पत्रकारांशी बोलत होत्या. हा कार्यक्रम चीनच्या अशांत शिनजियांग प्रांतात उइगरोंच्या कथित सामूहिक नजरबंदीच्या घटनेशी संबंधित होता.

अमेरिकेने आपला वार्षिक मानवाधिकार अहवाल जारी केला आहे. यात, शिनजियांगमध्ये चीनने मुस्लीम अल्पसंख्यक समुहांच्या सदस्यांना सामूहिकपद्धतीने ताब्यात घेण्याचे अभियान अधिक तीव्र केल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details