वॉशिंग्टन - जम्मू-काश्मीरमधून ५ ऑगस्टला आर्टिकल ३७० हटवल्यानंतर अमेरिकन सरकारने काश्मीरमधील तणाव कमी करण्याचा आग्रह धरला आहे. काश्मीरमधील तणाव कमी करण्यासाठी तेथे लावण्यात आलेले निर्बंध आणि राजकीय वावर कमी करावा, असे अमेरिकेने म्हटले आहे.
'विविध राजकीय आणि उद्योगपतींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, येथील रहिवाशांवर विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. याविषयी आम्ही सतत चिंता व्यक्त करत आहोत,' सरकारी प्रवक्ते मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे. 'तसेच, अनेक ठिकाणच्या मोबईल, इंटरनेट सेवा बंद असणे हाही चिंतेचा विषय आहे,' असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा -आंध्रप्रदेशात ७ वर्षीय मुलीवर अत्याचार, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
आम्ही सरकार आणि तेथील जबाबदार अधिकाऱ्यांना मानवाधिकारांचा आदर करण्याचे आवाहन करत आहोत. येथील राजकीय वावर आणि हस्तक्षेप मागे घेऊन लवकरात-लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणावी. तसेच, स्थानिक नेत्यांची सुटका करावी आणि आधी म्हटल्याप्रमाणे काश्मिरात ताबडतोब निवडणुका घ्याव्यात,' असे मॉर्गन म्हणाल्या.