वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यापार संधीमधून (आर्म्स ट्रेड ट्रिटी) अमेरिका बाहेर पडत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. इंडियानापोलिस येथे आयोजित राष्ट्रीय रायफल असोशिएशनच्या ( नॅशनल रायफल असोशिएशन) वार्षिक बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. शस्त्र व्यापार संधीच्या करारावर २०१३ मध्ये ओबामा प्रशासनाच्या काळात स्वाक्षरी करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यापार संधीमधून अमेरिका बाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - arms trade treaty
इंडियानापोलिस येथे आयोजित राष्ट्रीय रायफल असोशिएशनच्या वार्षिक बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे त्यांच्यावर काही आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संस्थांकडून टिका होत आहे.
अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2013 साली आंतराष्ट्रीय शस्त्र व्यापार संधीच्या करारावर स्वाक्षरी केली होती. परंतु, अमेरिकेच्या सर्वोच्च नियामक मंडळाद्वारे (सिनेट) हा करार मान्य केला गेला नव्हता. कारण सिनेटने हा करार दिशाभूल करणारा असून यामुळे अमेरिकेला त्याच्या सहयोगी देशांना आणि भागीदारांना शस्त्रे विकण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे त्यांच्यावर काही आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संस्थांकडून टिका होत आहे.